हरिहरेश्वर अग्रो सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विविध सेवा व्यवसायिक तत्वावर पुरविते
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या दुष्काळी तालुक्यातील तोंडोळी या गावातील प्रगतशील व्यावसाईक श्री नाना वारंगुळे यांनी या कंपनीचीस्थापना केली आहे. स्वतः श्री नाना हे समर्थ प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षपदावर असल्याने महाराष्ट्रातील विविधसेवाभावीकार्याशी अगदीजवळून संबध रोजचाच आहे.शासकीय योजना समन्वय केंद्राच्या माध्यमातून काम करताना शेतकर्यांना शासनाच्या शेतकर्यासाठी कोणकोणत्या योजना शेतकर्यांना मिळू शकतात याबाबद मार्गदर्शन करत असताना शेतकर्याशी जवळचा संबधआला.त्या माध्यमातून शेतकऱ्याशी चर्चा करताना त्यांना जाणवले कि शेतकर्याच्या समस्या नेमक्या काय आहेत.आपला शेतकरी पारंपारिक शेती करतो.त्यातून त्याला नफा न मिळता गुंतवणुकीत तोटा होता शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.तेव्हा शेतकऱ्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय तत्वावर हव्या असल्याचे दिसून आले.या कामात अनेकांना आपल्याशी जोडून घेतले. माती परीक्षण,पाणी परीक्षण.पिकतज्ञ, प्रयोगशाळाव बाजार भाव अशा साखळीची निर्मिती करीत नाना यांनी या व्यवसायाचा पाया घातला.

हरिहरेश्वर अग्रो सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुखातः शेतकरी,शेतकरी गट,व्यावसायिक शेती,सहकारी संस्था व कार्पोरेट संस्थाची शेती तसेच शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था तसेच व्यापारी कंपन्या,शेती संबधित वस्तू व सेवा पुरवठा करणारे व्यापारी इत्यादी साठी HR अग्रो सोलुशन्स कंपनी मोबाईल अप्प बनवले आहे.यामध्येविविधपिकाचीसंपूर्ण माहिती वपिक व्यवस्थापन संबधी या app मध्ये माहिती मिळते.